" हेका कीती वेळा हाड करा, परत थयच येवन बसात." सखारामने सरपणाचे लाकूड घेवून मिली कुत्रीच्या आंगावर फेकले. ते बरोबर तीच्या मागच्या पायावर लागले. क्षणभर ती तिथेच बसली. घाव वर्मी लागला होता. बिचारी कळवळली. दुसरा फटका बसेल या भीतीने लंगडत तिथून पळाली. मागोमाग तीची सहा छोटी छोटी पिल्ले.
मिलीचा तसा कोणी मालक नव्हता. वर्षभरापूर्वी एका जत्रेत एक पिल्लू खोतांना थंडीत कुडकुडताना दिसले. त्यावेळी फक्त त्या पिल्लाच्या डोक्यावरून हात फिरवला तर त्यांच्या मागेच लागले होते. शेवटी जेव्हा खोत जत्रेतून निघाले तेव्हा ते ही त्यांच्या मागून चालू लागले. छोट्या पिलाची खोतांसोबत चालताना खुप दमछाक होत होती. ते त्यांनी ओळखले. त्या पिल्लूला उचलून घेतले आणि घरी आणले. हे खोत सोडून फारसे कोणाला पसंद पडले नाही. त्यांच्या छोट्या नातीनेच तीचं नाव मिली ठेवले. मादी असल्यामुळे कोणी पाळायला बघत नव्हते. खोतांच्या घरातूनही विरोध होताच. पण खोत तीला जेवायला देत असत. जास्त करून ती खोतांच्या घरात असायची. पण खोत कुटूंबीय २ महीण्यासाठी मुंबईला गेले असल्यामुळे त्यांचे घर बंद होते. ती व्यायली असतानाच तिच्यावर ही आफत आली होती. खोतांना पण याची जाणीव होती म्हणुनच त्यांनी सखाराम कडे काही पैसे देवून मिलीला जेवायला द्यायला बोलले होते. पण सखाराम तीला हडतूड शिवाय काहीही देत नव्हता. बिचारीवर कठीण काळात उपासमारीची वेळ आली होती. सखारामच्या घरी सर्वजण जेवायला बसले की ती तिथे हजर व्हायची. पोर जेवत असली आशाळभूत नजरेने बघत राहायची. आपल्या पिल्लांना चाटत राहायची. आपल्या भुकेपेक्षा तीला पिल्लांचीच काळजी जास्त होती. सात पिल्ला पैकी एक पिल्लू तर दुध प्यायला न मिळाल्यामुळे दगावले होते. आता सहा पिल्लांना घेवून फिरत होती. सखाकामला ,खात असताना तीचे एकटक बघणे पसंद नसायचे. रेच होईल म्हणून तो भाकरीचा तुकडा तीच्या समोर उडवायचा. ती तो अलगद झेलायची. तो खावून झाला परत येउन बसायची. सखाराम परत तुकडा उडवायचा ती अलगद झेलायची. असे चार पाच वेळा व्हायचे. सखारामकडून अन्नाचा अपमान होत होता. पण मिली मात्र अन्नाचा अपमान होऊ देत नव्हती. काही गोष्टी प्राण्यांना कळतात पण मनुष्य प्राणी कळून पण न कळल्यासारखा करत असतो. दिवसेंदिवस जात होते. सखाराम काही तीला पोटभर जेवन देत नव्हता. परिणामी तीची प्रकृती ढासळत चालली होती . पिल्ले पण फारशी चांगली नव्हती . मिलीचे एक होते खोतांच्या अनुपस्थितीत सखाराम शिवाय कोणाच्याच घरी जात नव्हती की कुठे घाण भक्षण करत नव्हती . फक्त इतर वेळी ती वाडीतील दत्त मंदीरात बसून असायची. लोक मंदीरात पाया पडायला यायची तेव्हा त्यांच्याकडे आशाळभूत नजरेने बघायची. तीच्या डोळ्यातील भाव लोकांना वाचता येत नव्हते. खायला देणं सोडा पण तीला हडतुड करत दत्त महाराजांचे दर्शन घ्यायचे. तीच्या ढासळत्या प्रकृतीकडे कोणाचा लक्ष जात नव्हता. कींबहूना ती बारीक असल्यामुळे लोक तिला खुपच हडतूड करायचे. तेव्हा ती मान खाली घालून तिथून निघून जायची. तिचे डोळे खोतांच्या वाटेकडे लागलेले असायचे. रोज एक दोन वेळा त्यांच्या घराकडे जाऊन यायची. पण तिथे कोणीही नसायचे. निराश होउन परत दत्त मंदीर नाहीतर सखारामच्या घरी यायची.
रात्रीच्या वेळेला मात्र तीची फुल्ल ड्यूटी असायची.
हल्ली तिच्या भुंकण्याचा आवाज कमी होऊ लागला होता. कशी भुंकणार? तिच्यात त्राणच राहीला नव्हता आणि आज तर सरपणाच्या लाकडाच्या माराने तीचा पाय गरगरून सुजला होता. धड चालता येत नव्हती. तीच्या डोळ्यातील अश्रू पाहुन तीची पिल्ले टकामका तीच्या चेहऱ्याकडे बघत बसली होती. दुपारच्या वेळीस मार बसल्यामुळे रक्त बरेच गेले होते. तिचा तो पूर्ण दिवस तसाच गेला. पिल्लांना पण जास्त दुध मिळाले नाही. शरीराचे मटकुळ करून दत्तमंदीराच्या पायरीशी बसून राहीली. तीच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू पायरी भिजवून गेले. देवाला पण पाझर फुटत नव्हता . संध्याकाळपर्यंत ती जागची अजिबात हलली नाही. कातरवेळेला दामुअण्णांचा लेक दिवाबत्ती करायला तिथे आला , तो सकाळीच पुण्यावरून आला होता. त्याला सहा पिल्ले आणि एक कुत्री पायरीशी जखमी अवस्थेत दिसून आली. तो तीच्या जवळ गेला तशी बिलगून बसलेली पिल्ले पांगली. ती ही उठून पळायला बघत होती. पण दामुअण्णांचा मुलगा जवळ पोचला होता आणि तो तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागला होता. कधी मुक्याप्राण्याच्या डोक्यावरून हात फिरवून बघा, तो तुमचाच होऊन जातो. मायेच्या फिरणाऱ्या हातामुळे तीच्या डोळ्यातील अश्रू थांबायचे नाव घेईनात. त्याला तिचे दुख: समजून चुकले होते. तिच्या दुखऱ्या पायाला हात लावताच कळवळली. जखम छोटी असली तरी रक्त बरेच गेले होते शिवाय मुक्या मारामुळे सुजही होती. त्याने लगेच तिची जखम धुवून काढली आणि जखमेवर हळद भरली. पाय कॉटनच्या कपड्याने बांधताना तो खुपच काळजी घेत होता. दरम्यान मंदीरात दिवा बत्तीला वेळ झाला होता पण हे काम त्याहून श्रेष्ठ होते. दिवाबत्ती झाल्यावर तो टोपातून थोडे दुधही घेवून आला. त्यावर सहा पिल्ले आधाशासारखी तुटून पडली. पण मिलीने काही दूधाला तोंड लावले नव्हते. त्याला आश्चर्य वाटले. जसे पिल्लांचे पोट भरले तशी ती पिल्ले बाजूला झाली. मग राहीलेले दुध मिली प्यायला लागली. राहीलेल्या दुधाने तीचे पोट जेमतेम भरले असेल नसेल, पण तीचा चेहरा थोडा ताजातवाना झाला.

त्या रात्री ती सखारामकडे जेवणाच्या वेळेला फिरकली नाही. त्यानेही काही दखल घेतली नाही. बरीच रात्र झाली असावी, सखारामला दरवाज्याकडे बारीक आवाजात मिलीच्या भुंकण्याचा आवाज येत होता शिवाय दारावर धक्के बसल्याचा आवाजही येत होता. त्याने दरवाजा उघडून बाहेर बँटरी मारली त्या उजेडात त्याने जे पाहीले ते बघून गारच झाला. मिली तिचा दुखरा पाय ओढत एका सापाशी झुंज देत होती. तो साप दाराच्या फटीतून आत शिरायला बघत होता. सखारामने उंबऱ्याच्या आतूनच सापाला मारण्या प्रयत्न केला. पण मिली मध्ये असल्यामुळे दांडा मारता येत नव्हता. इतक्यात मिलीने मारलेला पुढच्या पायाचा पंजा सापाच्या डोळ्यावर बसला असावा. तो जागच्या जागी गोल गोल फिरायला लागला. हीच संधी साधून सखाराम बाहेर आला आणि सापाचे डोके ठेचले. एका मारातच तो निपचिप झाला. सखारामने लाईट्स लावायला सांगीतले. लाईटच्या उजेडात ते जनावर खुप धोकादायक वाटत होते. सखारामला आज रानात एका वारूळावरून चढून लाकडे तोडल्याचे आठवले , डूक धरून तोच साप आज घरात शिरला होता. जीवावर बेतलेला प्रसंगातून आज मिली कुत्रीमुळे आपण वाचलो हे त्याला कळून चुकले. मिलीचा रक्तबंबाळ पाय तो धरायला गेला पण ती तिथे थांबली नाही. तिला जाताना पाहून, सखाराम तीला पकडायला धावला आणी ती त्याला सहज मिळाली. पळायचे त्राण तिच्यात राहीले होते कुठे?. तीला एका साखळीने बांधून ठेवत जखमेवर औषधपाणी केलं. मिलीच्या मनात हे सर्व करून घ्यायची इच्छा नव्हती , ती साखळीला सारखे हिसके देत होती. पण तिचा नाविलाज होता. तिला चमत्कार झाल्यावर नमस्कार करणारी माणसे आणि त्यांची माणुसकी नको होती. हवं होतं निस्वार्थ प्रेम जे तिला मिळाले नव्हते.
दुसऱ्या दिवशी दामुअण्णाच्या मुलांने जनावरांचा डॉक्टरला घरी बोलविले. मिलीवर व्यवस्थित औषधोपचार करण्यात आले. आठ दिवसानी तो पुण्याला जाणार होता. त्याला मिलीला टाकून जायला जीवावर आले होते. त्यांनी एकमेकांना खुप जीव लावला होता. शेवटी काहीतरी जुगाड करून सहा पिल्ले आणि मिलीला घेऊन तो पुण्याला गेला. मिलीला आता हक्काचे घर मिळणार होते. पायरीवरच्या अश्रुंचा अभिषेक दत्त महाराजांची कृपा व्हायला पुरेसा ठरला होता. महीन्याभराने मुंबईहून परत आलेल्या खोतांची नजर मिलीला शोधत होती आणि सखाराम अपराधीपणाच्या भावनेत होरपळत होता.
शब्दांकन - नितीन राणे. ( कणकवली )
९००४६०२७६८
९००४६०२७६८
 
No comments:
Post a Comment